भ. पां. पाटणकर - लेख सूची

पत्रव्यवहार 

भ. पां. पाटणकर, 3-4-208, काचीगुडा, हैदराबाद – 500007  तुम्ही मांगे मला लिहिलेल्या दोन पत्रात दोन सूचना केल्या होत्या. एक म्हणजे विधायक लिहावे व दुसरे म्हणजे त्रोटक लिहावे.  जून 2004 च्या अंकातील ‘उलटे नियोजन’ हा लेख मला काही विधायक वाटला नाही. काय करायला हवे याचे काहीच विवेचन त्यात नाही. धरणे बांधायलाच नको होती का? त्यातले पाणी …

केन्स-मार्क्सवर अन्याय

जाने. २००३ च्या अंकात श्री. खांदेवाले यांनी केन्स व मार्क्स यांची मते विकृत स्वरूपात मांडली आहेत असे माझे मत आहे. श्रीमंतांना लुटणे झाल्यावर तळा-गाळातल्या लोकांना लुटा असे कोणतेही अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रज्ञ सांगत नाही. मंदी व त्यावरचे उपाय यांची तर्कशुद्ध चर्चा अर्थशास्त्रज्ञ करतात. पहिली गोष्ट अशी की मंदी ही घटना फक्त उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत होते. शेतकीप्रधान अर्थव्यवस्थेत …

शालेय शिक्षणाविषयी थोडेसे

१. आ.सु.च्या गेल्या काही अंकांतून शालेय शिक्षणाविषयी बऱ्याच चिंता व्यक्त झाल्या आहेत. “आम्हाला का विचारत नाही” असा प्र न जुलैच्या अंकाच्या पहिल्या पानावर पालकांतर्फे विचारला गेला आहे. ‘परभारे’ निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका आहे. २. १९८६ साली सरकारने शिक्षण धोरणावर जाहीर चर्चेचे आवाहन केले व झालेल्या चर्चेवर आधारलेली स्परेखा प्रसिद्ध केली. या स्परेखेचे पुनरवलोकन करताना NCERT …

भारताचे आर्थिक धोरण

आ.सु.च्या मार्च २००१ च्या अंकात भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल संपादकांनी चिंता व्यक्त केली आहे आणि “खऱ्याखुऱ्या’ तज्ज्ञांचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्या म्हणण्याचा हा दुसरा भाग जरा विचित्र वाटतो. खरे खुरे तज्ज्ञ कोण हे ठरविण्याचे आपल्याजवळ काही साधन नाही. निरनिराळ्या तज्ज्ञांचे म्हणणे आपण ऐकून घेऊन आपणच विषय समजून घ्यायला पाहिजे. विषयाची सर्वसाधारण समज एवढेच सामान्य वाचकाचे ध्येय …

बुद्धिवाद विरुद्ध भावविश्व

आंबेडकरी जीवनमूल्यांचा त्यांच्याच अनुयायांकडून पराभव आणि बुद्धिवाद्यांचा त्यांच्याच प्रकृतीकडून पराजय अशा दोन पराजय-कथा आ. सु. च्या जानेवारी अंकात आल्या आहेत. दोन्ही पराजयांचे कारण एकच आहे. ते म्हणजे बुद्धिवाद या नवीन मूल्यानेजुने सगळे काही एकदम बदलते असा समज. श्री. भोळे यांनी पहिल्या पराभवाची मीमांसा समर्थपणे आणि विद्वत्तापूर्ण भाषेत केली आहे. त्यांच्या मीमांसेचे सार असे की संस्कृतीचे …

पत्रव्यवहार

श्री बाबूराव यांस सप्रेम नमस्कार सुधारकचा जूनचा अंक तीन आठवड्यांपूर्वी माझ्या हातात आला त्यात तुमचा लेख वाचला. सध्या बरेच दिवसांपासून माझे वास्तव्य हैदराबादला असल्यामुळे पूर्वीच्या अंकांतून तुमचे व श्री कुळकर्णी यांचे काय लिखाण आले आहे ते कळले नाही. त्याचा संदर्भ न घेता काही विचार सुचले ते लिहीत आहे. चर्चा करण्या अगोदर define your terms” अशी …